Friday, 23 March 2018

आकुर्डी रुग्णालयात सुविधांचा अभाव

पिंपरी - महापालिकेच्या आकुर्डी येथील रुग्णालयात सध्या विविध वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. जुन्या इमारतीत हे दुमजली रुग्णालय सुरू आहे. जागा अपुरी असल्याने नूतनीकरणास अडचणी आहेत. आकुर्डीतील चर्चजवळील जागेत नवीन पाच मजली रुग्णालयाची उभारणी सुरू आहे. तेथे अद्ययावत सुविधा दिल्या जाणार आहेत. संबंधित रुग्णालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची गैरसोय दूर होईल.

वाकड-पुनावळे येथे तेरा अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

वाकड, (वार्ताहर) – पुनावळे आणि वाकड येथील एकूण 13 अनधिकृत बांधकामांवर जेसीबी फिरवण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. 25 मध्ये बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने 1 आर.सी.सी, 12 पत्राशेड अशा 13 बांधकामावर कारवाई करण्यात आली.

अशी घडतीय पुणे मेट्रो

पुणेकरांमध्ये  सध्या मोठ्या चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय म्हणजे पुणे मेट्रो. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले होते. भुमीपूजनानंतर लगेचच महामेट्रोकडून मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (रिच १) मार्ग क्रमांक़ १ हा एकुण १६.५८९ किमीचा आणि वनाज ते रामवाडी (रिच २) मार्ग क्रमांक २ एकुण हा ११.५७० किमीचा असणार आहे. यातील मार्ग क्रमा़ंक १ वरील शिवाजी नगर ते स्वारगेट या ठिकाणी भुयारी मेट्रो असणार आहे. या दोन मार्गांचे काम सध्या जोमाने सुरू आहे.

PCMC cracks whip on property tax defaulters

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has put focus on commercial establishments for recovery of property tax and penalty arrears.

Encroached footpaths and poor infra push pedestrians into harm’s way

PUNE: While as many as 238 pedestrians lost their lives to road accidents in the city in the past two years, the first two months of 2018 have also seen 16 pedestrian deaths.

महापालिकेच्या वतीने चिखलीत राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन

पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका, इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड अमॅच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी महापौर संजोग भिकू वाघेरे (पाटील) महापौर चषक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा 2017-2018 या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जाधववाडी चिखली येथील रामायण मैदानावर शुक्रवार (दि. 23) आणि शनिवार (दि. 24) रोजी या स्पर्धा पार पडणार आहेत.

विधवा, घटस्फोटित महिलांना पिंपरी पालिकेचा मदतीचा हात

पिंपरी पालिकेच्या वतीने १९९५-९६ पासून अशाप्रकारे अर्थसाहाय्य देण्यास सुरुवात केली.