Friday, 23 March 2018

महापालिकेच्या वतीने चिखलीत राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन

पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका, इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड अमॅच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी महापौर संजोग भिकू वाघेरे (पाटील) महापौर चषक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा 2017-2018 या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जाधववाडी चिखली येथील रामायण मैदानावर शुक्रवार (दि. 23) आणि शनिवार (दि. 24) रोजी या स्पर्धा पार पडणार आहेत.

No comments:

Post a Comment