पुणेकरांमध्ये सध्या मोठ्या चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय म्हणजे पुणे मेट्रो. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले होते. भुमीपूजनानंतर लगेचच महामेट्रोकडून मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (रिच १) मार्ग क्रमांक़ १ हा एकुण १६.५८९ किमीचा आणि वनाज ते रामवाडी (रिच २) मार्ग क्रमांक २ एकुण हा ११.५७० किमीचा असणार आहे. यातील मार्ग क्रमा़ंक १ वरील शिवाजी नगर ते स्वारगेट या ठिकाणी भुयारी मेट्रो असणार आहे. या दोन मार्गांचे काम सध्या जोमाने सुरू आहे.
No comments:
Post a Comment