Friday, 11 May 2018

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातुन पवना धरणातून गाळ काढण्याची मोहिम सुरूच; २ वर्षात ७५ हजार क्युबिक मीटर गाळ काढला

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरासह एमआयडीसी, तळेगांव, देहूरोड आणि मावळातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गाळ काढण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला आहे. दोन वर्षात धरणातून ७५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असून त्यामुळे धरणात ४५ दिवस पुरेल, इतका अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जल संवर्धनाच्या दृष्टीन सुरू केलेल्या या कामात खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्य ठेवले असून सलग तिस-या वर्षी गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात गुरुवारी (१० मे) पवना धरण भागात केली. 

पिंपळे सौदागरमध्ये ‘आंबा महोत्सवाचे’ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथे निर्मलाताई कुटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने  आयोजित करनण्यात आलेल्या ‘आंबा महोत्सवाचे’ उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सुनिताताई तापकीर, जयनाथ काटे, बबनराव झिंजुर्डे, शेखर कुटे, स्वीकृत नगरसदस्य संदीप नखाते, अरुण चाबुकस्वार, अनिल नखाते, भानुदास काटे, वाल्मिक कुटे, चंदाताई भिसे, संजय भिसे, सुप्रिया पाटील, संजय कुटे, जेष्ठ नागरिक व समस्त ग्रामस्त उपस्थित होते.

भाजपात ‘ना’राजीनामा नाट्य सुरूच; नगरसेवक वसंत बोराटे यांचा विधी सदस्यपदाचा राजीनामा

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपपासून फारकत घेण्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाहीत तोच, भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी ‘विधी’ समिती सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. महापौर नितीन काळजे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर देखील केला आहे.

'हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई'

पुणे - जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करून कामे वेळेत पूर्ण करावीत. जेणेकरून प्राप्त निधी वेळेत खर्च होईल. काही विकासकामे प्रलंबित असल्यास तत्काळ पाठपुरावा करावा. मात्र, हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला. 

राष्ट्रवादी शहर अध्यक्षपदाच्या निवडीत गटबाजी उफाळणार?

  • नेत्यांत रस्सीखेच : जयंत पाटील, अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष
– अधिक दिवे 
पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत पक्षांतर्गत गटबाजी उफाळण्याची शक्‍यता आहे. माजी आमदार विलास लांडे, विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल असे तीन गट तयार झाले असून आपल्याच गटाचा शहराध्यक्ष बसवण्यासाठी छुपी रस्सीखेच सुरू झाली आहे.

सहाय्यक आयुक्‍त डॉ. डोईफोडे यांचा स्थायीत माफीनामा

पिंपरी – स्थायी सदस्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे प्रशासन विभागचे सहाय्यक आयुक्‍त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांना चांगलेच महागात पडले. सूचनांच्या अंमलबजावणीबाबत स्थायी सदस्य विलास मडिगेरी यांनी जाब विचारता डोईफोडे यांनी सभागृहाची माफी मागून आपली सुटका करुन घेतली. स्थायी समितीच्या बुधवार दि. 9 ला साप्ताहिक बैठकीत या सर्व घडामोडी घडल्या. डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाल्याने त्यांना सक्‍तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी 25 एप्रिलला स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत विलास मडिगेरी यांनी केली होती. या बैठकीनंतर स्थायीची आणखी एक साप्ताहिक बैठक झाली. मात्र, या कारवाईबद्दल अधिकाऱ्यांनी चकार शब्दही काढला नाही.

Thursday, 10 May 2018

रस्तेखोदाई धोरणास मान्यता

पिंपरी-चिंचवडमधील रस्ते खोदाईबाबत महापालिकेने निश्चित केलेल्या धोरणाला स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. या धोरणानुसार महापालिकेच्या विद्युत, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि वाहतूक या विभागांचा 'ना हरकत दाखला' सादर केल्यानंतरच संबंधित एजन्सीला खोदाईला परवानगी दिली जाणार आहे.