पिंपरी – स्थायी सदस्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे प्रशासन विभागचे सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांना चांगलेच महागात पडले. सूचनांच्या अंमलबजावणीबाबत स्थायी सदस्य विलास मडिगेरी यांनी जाब विचारता डोईफोडे यांनी सभागृहाची माफी मागून आपली सुटका करुन घेतली. स्थायी समितीच्या बुधवार दि. 9 ला साप्ताहिक बैठकीत या सर्व घडामोडी घडल्या. डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी 25 एप्रिलला स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत विलास मडिगेरी यांनी केली होती. या बैठकीनंतर स्थायीची आणखी एक साप्ताहिक बैठक झाली. मात्र, या कारवाईबद्दल अधिकाऱ्यांनी चकार शब्दही काढला नाही.
No comments:
Post a Comment