Friday, 8 June 2018

भाटनगर चौकात बेशिस्तीमुळे रोजच कोंडी

पिंपरी : "येऽ चल, मागे घे गाडी, दिसत नाही का?', "अरे, तूच मध्ये घुसलाय, ते बघ आधी,' हा संवाद रिक्षाचालक आणि दुचाकीस्वारामध्ये सुरू असतानाच, हॉर्न वाजवून "ओ काका, थोडी पुढे घ्या,' असे म्हणत एका तरुणाने पदपथावर दुचाकी चढवली आणि निघून गेला. अन्य वाहनचालकांनी जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरुवात केली. अखेरीस दोन तरुणांनीवाहतूक नियंत्रकाचे काम बजावून चौक मोकळा केला.

नळ जोडणीची माहिती प्रभाग कार्यालयात

पिंपरी – शहरातील नागरिकांना नव्याने नळजोड अथवा जलनि:स्सारण लाईनकरिता आवश्‍यक असलेल्या आवश्‍यक कागदपत्रांची यादी व कालावधीचा माहिती फलक महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये दर्शनी भागांत झळकणार आहे. याशिवाय यासोबतच अधिकृत प्लंबरची यादी देखील मोबाईल क्रमांकासह लावली जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ऐनवेळच्या या दोन्ही ठरावांना मान्यता देण्यात आली आहे. ममता गायकवाड बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.

नवी सांगवीत विविध उपक्रमांनी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

नवी सांगवी (पुणे) - शिवकालीन शस्त्रास्त्रंचे प्रदर्शन, शिवराज्याभिषेक गुढी, शिवकीर्तन यासारख्या उपक्रमांनी येथील ओम साई ट्रस्टच्या वतीने 344 वा शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. येथील साईचौक सकाळपासूनच भगवे झेंडे व फेटा परिधान केलेल्या तरूणांमुळे भगवामय झाला होता. 

धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन जनजागृती

 पिंपरी - आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसींग जागृती दिनानिमित्त (रेल्वे) गुरुवारी धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन संस्कार प्रतिष्ठानतर्फे जनजागृती करण्यात आली. चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत हा उपक्रम घेण्यात आला.

विजेचे मीटर होणार स्मार्ट प्रि पेड

नवी दिल्ली – येत्या 3 वर्षात देशातील विजेचे सर्व मीटर स्मार्ट प्रि पेड होणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग यांनी दिली. ऊर्जा मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे आयोजित मीटर उत्पादकांच्या बैठकीत ते आज बोलत होते. सर्व मीटर उत्पादकांनी स्मार्ट प्रि पेड मीटरच्या किंमती कमी करुन त्याचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित उत्पादकांना केले.

आला पावसाळा; विजेचे धोके टाळा

पिंपरी : "पावसाळ्यात विद्युत उपकरणे आणि तारांमुळे विद्युत अपघाताच्या दुर्दैवी घटना घडतात. त्या पार्श्‍वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. विद्युत ग्राहकांनी या सूचनांचे पालन करून सावध व सुरक्षित राहावे,'' असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे, पिंपरीमधील नागरिकांची खंडित वीजपुरवठ्यामुळे गैरसोय

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दोन ठिकाणी जेसीबीने खोदकाम करत असताना महावितरणच्या दोन भूमिगत वाहिन्या तुटल्या. त्यामुळे झालेल्या खंडित वीजपुरवठ्यामुळे आठ हजार 700 नागरिकांची गैरसोय झाली.