पिंपरी – राज्यातील 88 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. राज्य गृह विभागाने त्यांच्या बढतीचे आदेश काढले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 8 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. तर पिंपरी व निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देखील सहाय्यक आयुक्तपदी बढती मिळाली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 11 June 2018
‘गुगल’ देणार मराठीला उभारी
प्रादेशिक भाषेतील साहित्याची, विशेषत: मराठी साहित्याची वाढती मागणी लक्षात घेऊन 'गुगल'ने मराठी साहित्यिक आणि लेखकांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून एका अभिनव उपक्रमाची आखणी केली आहे. इंटरनेटमार्फत आपले साहित्य आणि पुस्तके पोहोचवू पाहणाऱ्या लेखक आणि प्रकाशकांना गुगलतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी 'गुगल सर्च संमेलन' या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार असून, त्याचा पहिला टप्पा म्हणून येत्या २२ जून रोजी गुगलतर्फे पुण्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठीसाठी आवश्यक गुगल्सच्या विविध फिचर्स संदर्भात या कार्यशाळेत माहिती दिली जाईल.


खासदार श्रीरंग बारणे यांना सलग चौथ्या वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान
पिंपरी (Pclive7.com):- खासदार श्रीरंग बारणे यांना सलग चौथ्या वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आलायं. केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल, पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल एम.के. नारायनन व माजी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एस. कृष्णमुर्ती यांच्या हस्ते चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी सभापती झाल्या दहावी पास!
पिंपरी (Pclive7.com):- श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिका तिजोरीच्या चाव्या हातात असलेल्या स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड दहावीची परीक्षा पास झाल्या आहेत. त्यांना ५५ टक्के गुण मिळाले आहेत. स्थायी समिती सारखे महत्वाचे पद सांभाळत त्यांनी अभ्यास करुन दहावीची परीक्षा दिली आणि त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण देखील झाल्या. त्यांच्या या यशाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
नगरसेविका कमल घोलप झाल्या १० वी पास; ७२ टक्के गुण मिळवत दिला नवा आदर्श!
पिंपरी (Pclive7.com):- शिक्षणाला वयाची कोणतीच अट नसते हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका कमल घोलप यांनी दाखवून दिलयं. वयाच्या ३९ वर्षी त्यांनी दहावीची परिक्षे दिली अन् ७२ टक्के गुण मिळवत पास देखील झाल्यात. राजकारण, संसार करत असताना जिद्द आणि इच्छा शक्ती असेल तर सर्वच शक्य होतं हे त्यांनी सिध्द करून दाखवलयं. त्यांना मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत असून सर्वांपुढे त्यांनी एक आर्दश ठेवला आहे.
प्रिमीयर कामगारांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठींबा
पिंपरी ः गेल्या 60 दिवसांपासून विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या प्रिमीयर कामगारांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पाठींबा दिला.
‘महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समितीची’ पिंपरीत स्थापना
पिंपरी – राज्यातील महानगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदामध्ये काम करणा-या कामगारांना अनेक समस्या भेडसावत आहेत. कायम कामगारांची संख्या कमी करून कंत्राटी कामगारांची संख्या वाढविण्यावर आणि ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी प्रशासन, राज्यकर्त्यांकडून कामगार कायदा पायदळी तुडवला जात आहे. नियमांकडे बोट दाखवून कामगारांचे शोषण केले जात आहे. कामगारांचे प्रलंबित प्रश्न, मागण्या सोडविण्यासाठी राज्यातील सर्व कामगार संघटनांना एकत्रित करून राज्यस्तरीय कामगार संघटना संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली असून याव्दारे कामगार हितासाठी राज्यव्यापी लढा उभारण्यात येईल, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे बबन झिंजुर्डे यांनी शनिवारी पिंपरी, पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.
Subscribe to:
Posts (Atom)