Thursday, 16 August 2018

उत्तम नागरिक बनण्यासाठी प्रयत्न – कुलकर्णी टाटा मोटर्स तर्फे विद्यार्थ्याना कुशल प्रशिक्षण

विद्यार्थ्यानी उत्तम नागरिक बनण्यासाठी प्रयत्नशीलव्हावे असे मत यशस्वी अकडमी फॉर स्किल्स संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

पीसीसीओईमध्ये गुरुवारी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) गुरुवारी (दि. 16 ऑगस्ट) ‘कम्प्युटींग, कम्युनिकेशन, कंट्रोल व ॲटोमेशन’ या विषयांवर आयईईई या संस्थेच्या पुणे विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समन्वयक डॉ. स्वाती शिंदे व डॉ. अनुराधा ठाकरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. 

[Video] पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय झेंडा वंदन


पोलीस विभागाने पिंपरी चिंचवड येथील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे – पालकमंत्री गिरीश बापट

सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून पिंपरी चिंचवड येथील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. पिंपरी-चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात तात्पुरत्या स्वरुपात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आज कार्यान्वित झाले. प्रारंभी याठिकाणी बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.

स्वातंत्र्यदिनी गिरीश बापट यांना उशीर, अर्धा तास पोलीस कर्मचारी पावसात ताटकळत

पोलीस अधिकारी व कर्मचारी मंत्री महोदयांची प्रतीक्षा करत होते. मात्र मंत्री महोदयांना पोहोचायला अर्धा तास उशिर झाला.

पीएमपीचे पंचिंग पास आजपासून

पुणे - विद्यार्थी, कष्टकरी आणि महिलांना उपयुक्त ठरणारे पंचिंग पासचे वितरण स्वातंत्र्य दिनापासून करण्याची घोषणा पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी मंगळवारी केली. 

Tuesday, 14 August 2018

स्मार्ट सिटीचे निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना

पालिकेच्या मालमत्तांचा वापर करण्याचे सर्वाधिकार मिळणार
महासभेमध्ये होणार शिक्कामोर्तब
पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील कामे करण्यासाठी महापालिकेच्या मालकीची जागा, रस्ते, उद्याने, विद्युत पोल, चौक, शाळा, इमारतींसह इतर मालमत्तांचा वापर करण्यास देण्याचे सर्वाधिकार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावावर 20 ऑगस्ट रोजी होणार्‍या महासभेत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा केंद्र सरकारच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी योजनेत तिसर्‍या टप्प्यात समावेश झाला आहे. त्यानंतर 9 जानेवारी 2017 रोजी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनीची स्थापना करण्यात आली होती. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयएएस दर्जाचा अधिकारी अथवा त्यातील तज्ज्ञ व्यक्तीचा शोध सुरू आहे. तोपर्यंत आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे