Thursday, 16 August 2018

सोसायट्यांच्या कचरा प्रक्रिया करण्याला मुदतवाढ

ओल्या कचऱ्यावर निर्मितीच्याच ठिकाणी प्रक्रिया न करणाऱ्या शहरातील सोसायट्यांवरील कारवाईला २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या सोसायट्यांकडून दंड वसूल करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंगळवारी दिला.

मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखेंना पुन्हा आर्थिक अधिकार बहाल

ठेकेदारधार्जिणे काम केल्याच्या कारणावरून महापालिकेच्या मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे यांचे आर्थिक अधिकार दोन वेळा काढून घेण्यात आले होते. ते अधिकार त्यांना पुन्हा बहाल करण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी (दि.१४) आयत्यावेळी घेतला.

शास्तीकर ठरविण्याचा अधिकार महापालिकेला मिळणार : सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती

अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी दंड ठरविण्याचा अधिकार महापालिकांना देण्याची घोषणा मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील एका कार्यक्रमात केली होती. त्यानंतर अनधिकृत बांधकामांवर लावण्यात येणारा दंडात्मक शास्तीकर ठरविण्याचा अधिकारदेखील महापालिकांना देण्याचा निर्णय मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. लवकरात याबाबतचा अध्यादेश निघणार आहे. त्यामुळे नागरिकांना शास्तीकरापासून दिलासा मिळणार असल्याचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘युवा माहिती दूत’ सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणार

‘युवा माहिती दूत’ सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणार

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नावापुरतच?

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन 
कृष्णा पांचाळ
पिंपरी-चिंचवडच्या २० लाख जनतेची पोलीस आयुक्तलयाची आता प्रतीक्षा संपणार आहे.अखेर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कामकाज उद्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर ध्वजारोहण करून सुरू केलं जाणार आहे. महानगर पालिकेच्या ऑटोक्लस्टर इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात कामकाजाचा शुभारंभ होईल. मात्र प्रत्यक्षात तिथं केवळ आयुक्तालय नावाचे फलक आणि ध्वजारोहनाचं साहित्य पोहचल आहे. त्यामुळं आयुक्तालय सुरू करण्याची घाई नेमकी कोणासाठी आणि कशासाठी असा प्रश्न शहरवासीयांकडून विचारला जातोय.

वरिष्ठ पाेलीस निरिक्षक विठ्ठल कुबडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाेलीसांना राष्ट्रपती पदकाची घाेषणा करण्यात अाली अाहे. यामध्ये पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरिक्षक विठ्ठल खंडुजी कुबडे यांना राष्ट्रपती पदक जाहिर झाले. ते १९९३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणुन सेवेत रूजू झाले. महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकॅडमी नाशिक येथील प्रशिक्षणानंतर पहिली पोस्टींग भंडारा येथील साकोली येथे झाली. त्यानंतर अतिनक्षल ग्रस्त भाग  गोरेगाव, सालेकसा, दरेकसा,अर्जुनी मोरगाव आदी नक्षल परिसरात त्यांनी काम केले. कुबडे यांची १५ आॅगस्ट २०१८ ला राष्ट्रपती पदकासाठी निवड झाली आहे.

रिक्षावाल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ : गिरीश बापट

रिक्षा चालकांचे आणि सामान्य नागरिकांचे एक विशिष्ट नाते असते. रिक्षावाला हा शहरातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख आदरानेच केला पाहिजे. रिक्षावाल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र रिक्षा चालक महामंडळ स्थापन केले आहे परंतु, अद्याप त्याचे काम सुरु झाले नाही. राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे परिवहन विभागाच्या वतीने सर्व रिक्षा संघटनांसोबत तत्काळ बैठक लावून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे दिले.