Friday, 24 August 2018

गुंडांकडून तोडफोड सामान्यांसाठी डोकेदुखी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये आळंदी आणि चिखली पोलीस ठाण्यांचा नव्याने समावेश झाला आहे.

कचर्‍याच्या समस्या पथनाट्याद्वारे मांडल्या

महापालिकेच्यावतीने राबविला उपक्रम
चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन संस्थेने या प्रदर्शनात जनजागरण व प्रबोधन करण्यासाठी कचर्‍याचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरणाबाबत माहिती देण्यात आली. शहरातील कचर्‍याच्या विविध समस्या योग्य पद्धतीने व प्रभावी माध्यमातून समाजासमोर मांडण्यासाठी 30 पथनाट्ये शहरातील महाविद्यालयीन 460 विद्यार्थ्यांतर्फे सादर करण्यात आली. या प्रदर्शनास शहरातील जवळपास 8000 लोकांनी उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रदर्शनास आलेल्या पाहुण्यांसाठभ पथनाट्य हा एक आकर्षणाचा विषय बनला होता.

लाईट नाही, बिले मात्र भरमसाठ

महावितरणचा भोंगळ कारभार
चिंचवड : पावसाळा सुरू झाल्यापासून या परिरात वीजेचा सातत्याने लपंडाव सुरू आहे. पाऊस सुरू झाला की, वीज जाते. वीजेच्या लपंडावाने नागरिक त्रासले आहेत. व्यवस्थित सेवा न देेणार्‍या महावितरण मात्र मोठ्या रकमेची वीज बिले नागरिकांना देत आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून महावितरणाच्या बिलामध्ये गडबड होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः चिंचवड परिसरात ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. केवळ रहिवासीच नव्हे तर व्यावसायिक वीज ग्राहकांनादेखील महावितरणाच्या कारभाराने त्रासून सोडले आहे. चिंचवडमधील अनेक ग्राहकांना अव्वाच्या-सव्वा विज बिले येत आहे. एक वर्षापासून 524 युनिट उद्योगनगर येथील क्वीन्सपार्क सोसायटीतील महिला ग्राहकांना सप्टेंबर 2017/ ऑगस्ट2018 एकासारखेच बिल येत आहे. दर महिन्याला वापरलेले युनिट 524 इतकेच येत आहे. संपूर्ण वर्षभरात एकदाही एकही युनिट वाढला नाही कि कमी झाला नाही. युनिट एक सारखे जरी असली तरी बिलाची रक्कम मात्र बदलत राहते.

पोलिसांची ‘संगीतखुर्ची’

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचा नियंत्रण कक्ष पिंपरी पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ७५ आहे. मात्र, त्यांना बसण्यासाठी केवळ १५ खुर्च्या उपलब्ध आहेत. त्यामुळे एक खुर्ची रिकामी झाली की त्यावर दुसऱ्याचा ‘डोळा’ असतो. संगीतखुर्चीचा हा खेळ आठवडाभरापासून सुरू आहे.

संस्कृतप्रेमी आयटीयन्सचा नाटकरूपी कलाविष्कार

पिंपरी - ते सर्व जण वेगवेगळ्या प्रांतांतील... कुणी पंजाबी, कुणी बंगाली... कुणी गुजराथी, कुणी राजस्थानी... कुणी बिहारी, कुणी पुणेरी... कुणी तेलगू तर कुणी केरळी... प्रत्येकाची भाषा वेगळी... संस्कृती वेगळी... पण, या संस्कृतीलाच हजारो वर्षांपासून एका धाग्यात घट्ट बांधून ठेवणाऱ्या संस्कृतच्या प्रेमापोटी ते एकत्र आले आणि संस्कृतचे अध्ययन सुरू झाले. 

पाच चोरट्यांकडून चोरीच्या 20 दुचाकी हस्तगत

पिंपरी (पुणे) : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या पाच जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ लाख 55 हजारांच्या 20 दुचाकी हस्तगत केल्या. रामेश्‍वर विलास खंदारे (वय 25, रा. शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी), अनिल तबा काळे (वय 21, रा. भोसरमाळ, कन्हेर, पो. पोखरी ता. पारनेर, जि. अहमदनगर), अविनाश वामन मध्ये (वय 19, रा. म्हसोबाझाप, पो. पोखरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), ओंकार रमेश चव्हाण (वय 19, रा. भोसलेनगर, गोशाळेशेजारी, आळंदी, ता. खेड, जि. पुणे), रामेश्‍वर परमेश्‍वर भिसे (वय 21, रा. मरकळ, राजगुरुनगर बॅंकेच्या मागे, आळंदी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्राप्तिकर भरणात मोठी वाढ

नवी दिल्ली: गेल्या आर्थिक वर्षात प्राप्तिकराची वसुली विक्रमी झाली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्‍ट टॅक्‍सेसने (सीबीडीटी) दिलेल्या माहितीनुसार 2017-18 या आर्थिक वर्षात प्राप्तिकराचा भरणा 10.03 लाख कोटी रुपये झाला आहे.