Friday, 24 August 2018

लाईट नाही, बिले मात्र भरमसाठ

महावितरणचा भोंगळ कारभार
चिंचवड : पावसाळा सुरू झाल्यापासून या परिरात वीजेचा सातत्याने लपंडाव सुरू आहे. पाऊस सुरू झाला की, वीज जाते. वीजेच्या लपंडावाने नागरिक त्रासले आहेत. व्यवस्थित सेवा न देेणार्‍या महावितरण मात्र मोठ्या रकमेची वीज बिले नागरिकांना देत आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून महावितरणाच्या बिलामध्ये गडबड होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः चिंचवड परिसरात ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. केवळ रहिवासीच नव्हे तर व्यावसायिक वीज ग्राहकांनादेखील महावितरणाच्या कारभाराने त्रासून सोडले आहे. चिंचवडमधील अनेक ग्राहकांना अव्वाच्या-सव्वा विज बिले येत आहे. एक वर्षापासून 524 युनिट उद्योगनगर येथील क्वीन्सपार्क सोसायटीतील महिला ग्राहकांना सप्टेंबर 2017/ ऑगस्ट2018 एकासारखेच बिल येत आहे. दर महिन्याला वापरलेले युनिट 524 इतकेच येत आहे. संपूर्ण वर्षभरात एकदाही एकही युनिट वाढला नाही कि कमी झाला नाही. युनिट एक सारखे जरी असली तरी बिलाची रक्कम मात्र बदलत राहते.

No comments:

Post a Comment