पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा नियंत्रण कक्ष पिंपरी पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ७५ आहे. मात्र, त्यांना बसण्यासाठी केवळ १५ खुर्च्या उपलब्ध आहेत. त्यामुळे एक खुर्ची रिकामी झाली की त्यावर दुसऱ्याचा ‘डोळा’ असतो. संगीतखुर्चीचा हा खेळ आठवडाभरापासून सुरू आहे.

No comments:
Post a Comment