‘नागपूर कनेक्शन’मुळे आधीच विरोधकांच्या ‘रडार’वर असलेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे सत्ताधारी व विरोधकांच्या वादात ‘सॅण्डविच’ झाले आहे. त्यामुळे ते चिडचिडे झाल्याचे दिसत आहेत. पालिकेच्या ‘स्मार्ट सिटी’ कंपनीच्या शहर सल्लागार समिती बैठकीत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी त्यांनी साने यांचे अज्ञान काढले, तर मूळचे आक्रमक असलेल्या साने यांनी आयुक्तांना उद्देशून ‘आम्ही पालिकेचे विश्वस्त आहोत, तुम्ही पगारी नोकर आहात, लायकीप्रमाणे राहा,’ या शब्दांत त्यांना सुनावले. त्याच्या दुसर्या दिवशी झालेल्या शहर विकास व शहर परिवर्तन आराखडा या विषयावरील चर्चासत्रास गटनेतेच काय, पण महापौरांनाही निमंत्रण न दिल्याने त्यांना विरोधकांनी पुन्हा लक्ष्य केले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 7 September 2018
महापालिकेच्या आयुक्त श्रावण हर्डीकरांनी व्यक्त केली दिलगिरी !
मी शहराच्या हिताचे काम करत आहे. मनोभावे काम करत असताना सर्वांचा आदर, सन्मान राखणे माझे कर्तव्य आहे. माझ्याकडून अनुचित शब्द गेले असेल. त्यातून कुणाचा अवमान झाला असेल तर मी दिलगीर आहे, असे सांगत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वादावर पडदा टाकला.
पीएमपीएलचा पिंपरी-चिंचवडसोबत दुजाभाव; अध्यक्षा नयना गुंडे यांना नगरसेवकांनी धरले धारेवर
पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराला दुय्यम वागणूक दिली जात आहे. पीएमपीएलसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका 40 टक्के खर्च करते. पुणे पालिकेचा केवळ 10 टक्के हिस्सा जास्त असून, तो भारही पालिकेने उचलून समान दर्जा मिळवा. त्यातूनही तोडगा न निघाल्यास आणि शहराची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी म्हणून शहरासाठी स्वतंत्र बस वाहतुक व्यवस्था निर्माण करावी, अशा तीव्र भावना पालिका सर्वसाधारण सभेत सर्वच पक्षांच्या सदस्यांनी व्यक्त केल्या. प्रश्नांचा भडिमार करीत नगरसेवकांनी पीएमपीएमच्या अध्यक्षा नयना गुंडे यांना धारेवर धरले. मध्यस्थी करीत महापौर राहुल जाधव यांनी पीएमपीएलसंदर्भात विशेष सभा घेण्याचे जाहिर करीत चर्चेला लगाम दिला. तसेच, 200 बस खरेदीचा विषय तहकूब करण्यात आला.
चाकणची कोंडी सोडविण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’
ऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी अॅक्शन प्लॅन बनविण्यास सुरवात केली आहे. आयुक्त पद्मनाभन यांच्यासह अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी गुरुवारी (६ सप्टेंबर) चाकण पोलिस ठाणे आणि परिसराला भेट दिली. या वेळी येथील वाहतूक कोंडीबाबत त्यांनी ठोस उपाय योजना आखण्याचे काम हाती घेतले आहे.
भाजप नगरसेवक पाणी धोरणावरून आक्रमक
पवना धरणात मुबलक पाणीसाठा असताना पिंपरी-चिंचवडमध्ये 'पाणी अडवा अन् नगरसेवकांची जिरवा' हे धोरण महापालिका प्रशासन राबवित असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत करण्यात आला. सहा महिन्यांपूर्वीच मंजूर झालेल्या पाणी धोरणाची अंमलबजावणी न केल्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनीही आक्रमक भूमिका घेतली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार
पुणे शहर आणि जिल्हय़ाची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि जिल्हय़ातील दहा अशा २१ विधानसभा मतदार संघांमधील मिळून मतदारांची संख्या ७१ लाख ८९ हजार २६५ झाली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीबाबत नागरिकांना ३१ ऑक्टोबपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)