‘नागपूर कनेक्शन’मुळे आधीच विरोधकांच्या ‘रडार’वर असलेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे सत्ताधारी व विरोधकांच्या वादात ‘सॅण्डविच’ झाले आहे. त्यामुळे ते चिडचिडे झाल्याचे दिसत आहेत. पालिकेच्या ‘स्मार्ट सिटी’ कंपनीच्या शहर सल्लागार समिती बैठकीत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी त्यांनी साने यांचे अज्ञान काढले, तर मूळचे आक्रमक असलेल्या साने यांनी आयुक्तांना उद्देशून ‘आम्ही पालिकेचे विश्वस्त आहोत, तुम्ही पगारी नोकर आहात, लायकीप्रमाणे राहा,’ या शब्दांत त्यांना सुनावले. त्याच्या दुसर्या दिवशी झालेल्या शहर विकास व शहर परिवर्तन आराखडा या विषयावरील चर्चासत्रास गटनेतेच काय, पण महापौरांनाही निमंत्रण न दिल्याने त्यांना विरोधकांनी पुन्हा लक्ष्य केले.
No comments:
Post a Comment