पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराला दुय्यम वागणूक दिली जात आहे. पीएमपीएलसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका 40 टक्के खर्च करते. पुणे पालिकेचा केवळ 10 टक्के हिस्सा जास्त असून, तो भारही पालिकेने उचलून समान दर्जा मिळवा. त्यातूनही तोडगा न निघाल्यास आणि शहराची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी म्हणून शहरासाठी स्वतंत्र बस वाहतुक व्यवस्था निर्माण करावी, अशा तीव्र भावना पालिका सर्वसाधारण सभेत सर्वच पक्षांच्या सदस्यांनी व्यक्त केल्या. प्रश्नांचा भडिमार करीत नगरसेवकांनी पीएमपीएमच्या अध्यक्षा नयना गुंडे यांना धारेवर धरले. मध्यस्थी करीत महापौर राहुल जाधव यांनी पीएमपीएलसंदर्भात विशेष सभा घेण्याचे जाहिर करीत चर्चेला लगाम दिला. तसेच, 200 बस खरेदीचा विषय तहकूब करण्यात आला.
No comments:
Post a Comment