Sunday, 14 October 2018

तेजस्विनी बस तपासणीचे काम लवकरच सुरू होणार

तपासणीसाठी खास महिला पथक स्थापन
पुणे : खास महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बससेवेला चांगला प्रतिसाद मिळाला असून या बसेस तपासणीसाठी खास महिला पथक स्थापन करण्यात आले आहे. चार महिलांचा समावेश असलेल्या या पथकाला पंधरा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत हे पथक पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

शहरातील एकमेव श्री भवानीमाता सांस्कृतिक महिला मंडळ

एमपीसी  न्यूज –  शहरात सध्या नवरात्र उत्सवात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. घटस्थापनेच्या दिवशी जयघोष व मिरवणुक काढून निगडीतील श्री भवानीमाता सांस्कृतिक महिला मंडळाने आदर्श ठेवला आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य   म्हणजे  मंदिरातील पूजा, स्वच्छता, विविध उपक्रम घेण्याचे निर्णय़ सर्व महिला मंडळ करीत आहे. दरवर्षी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम या मंडळामार्फत घेण्यात येतात

नगरसेविका राजश्री काळे पालिकेत गर्दीसमोर रडल्या

पुणे : शहरभर अतिक्रमणे थाटली गेली आहेत, ती तुम्हाला दिसत नाहीत का ? मग, पारधी समाजातील कुटुंबीयांच्या घरांवर हातोडा का उगारला, अशा शब्दांत अतिरिक्त आयुक्तांना जाब विचारत, सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका राजश्री काळे यांनी महापालिकेच्या प्रशासनाची कोंडी केली. मात्र, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आपले म्हणणे ऐकून घेत नसल्याने काळे यांचा कंठ दाटून आला आणि गर्दीसमोरच त्या ढसाढसा रडल्या. ज्या लोकांच्या घरांवर कारवाई झाली, त्यांना महापालिकेत आणून आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. 

पिंपरी–चिंचवड शहरातील कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका – दत्ता साने

चौफेर न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करुन तो मोशी डेपो येथे डपिंग करणे, या कामाचा कालावधी २०१६ ला संपला असतानाही वेळोवेळी निविदा प्रक्रीया टाळून सबंधित अधिकारी व भाजपा पदाधिकाऱ्यांनी आर्थिक हित जोपासत महापालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे. या निविदेमध्ये महापालिकेचे सुमारे ८४ कोटी ५१ लाखांचे नुकसान झाले आहे. तरी, मागील स्थायी समिती तसेच वाढीव निविदा काढणारे संबधित अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच संबंधीत ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी पिंपरी – चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. या संदर्भात, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

सिद्धार्थनगर भागात स्वच्छतेचा बोजवारा

पिंपरी – तुंबलेल्या ड्रेनेज लाईन, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव यामुळे दापोडीतील सिद्धार्थनगर रहिवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या तक्रारीं निकालात काढा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्यांची गांभिर्याने दखल घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी स्थानिक पातळीवरच निकाली काढण्याबाबत ठोस कार्यवाही करुन, दर तीन महिन्यांनी त्याचा अहवाल प्रशासन विभागाकडे पाठविण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Saturday, 13 October 2018

शहरात चाललेल्या अवैध वृक्षतोडीविरोधात सामाजिक संस्था सन्मानपत्र करणार परत

वाल्हेकरवाडी (पुणे): शहरात बेसुमार अवैधरित्या वृक्षतोड चालूच आहे वारंवार मागणी करून देखील अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कुठे हि कडक कारवाई केली गेली नाही अथवा वृक्ष कायदा यामध्ये तरतूद असून, देखील आजपर्यंत एक हि गुन्हा नोंद झाला नाही किंवा जाणीवपूर्वक केला गेला नाही.