पिंपरी - शहरात निर्माण होणारा कचरा रोज गोळा करून मोशी डेपोमध्ये नेला जात असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा एकीकडे, तर दुसरीकडे बहुतांश ठिकाणी कचराकुंड्या तुडुंब भरलेल्या असून काही ठिकाणी तो रस्त्याच्या कडेलाच फेकून दिल्याचे वास्तव सोमवारी (ता. २२) ‘सकाळ’ने शहरात केलेल्या पाहणीत आढळले. त्यामुळे नेमके चुकते कोण? दुर्गंधी व अस्वच्छतेला जबाबदार कोण? तसेच स्वच्छता अभियानाचाच ‘कचरा’ झाला का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 23 October 2018
आधी आगामी रक्कम, मग मोफत सेवा
पुणे - महिन्यातील एक दिवस मोफत सेवा द्यावयाची असेल, तर आगाऊ रक्कम द्या, असे पत्र पीएमपी प्रशासनाने महापालिकेला पाठविले आहे, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने अद्याप यासंदर्भात प्रस्तावच मंजूर केला नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमाची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.
कंत्राटदाराचे पावणे दोन लाखांचे साहित्य लंपास
पिंपरी – पुनावळे येथे रस्ता बांधणीसाठी महापालिकेच्या कंत्राटदाराने “स्टोअर रूम’मध्ये ठेवलेले पावणे दोन लाखांचे साहित्य चोरट्याने लंपास केले. या प्रकरणी रविवारी (दि. 21) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या 30 शाळांना क्रीडांगणाचा अभाव
पिंपरी – महापालिकेच्या 30 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तसेच, या शाळांना अनेक वर्षापासून क्रीडा शिक्षक नसल्याचे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राविषयी मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे, विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये नैपुण्य असूनही त्यांचे नुकसान होत आहे.
खासदारांचा जनेतशी थेट संवाद
पिंपरी- मावळ लोकसभा मतदार संघातून लोकप्रतिनिधित्व करताना आजवर केलेल्या कामांचा लेखा-जोखा मांडण्यासाठी व जनतेच्या थेट प्रश्नांना उत्तर देण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘संवाद खासदारांचा थेट जनतेशी’ या कार्यक्रमात हजेरी लावली. शिवसेनेच्या वतीने आकुर्डी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वृक्षतोडप्रकरणी उद्यान अधीक्षकांना नोटीस
पिंपरी – शहरात विविध ठिकाणी महापालिकेचे ठेकेदार व इतरांकडून विनापरवाना वृक्षतोड होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले. ही बाब वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत सोमवारी (दि. 22) नगरसेवकांनी उपस्थित केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे यांना आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. तर, नगरसेवकांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
...अन बीआरटी दरवाजा उघडा ठेवत धावली पीएमपीएल
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा टेंबा मिरवणार्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) चालक आणि वाहकाचा गलथानपणा उघड झाला आहे. नरवीर तानाजी वाडी डेपोच्या बसचा अचानक बीआरटी दरवाजा उघडूनही बस तशीच चालवल्याची घटना घडली आहे. प्रवाशांनी दरवाजा बंद करण्याच्या सुचनेनंतरही चालक आणि वाहकाने दुर्लक्ष करत बस पुढे मार्गस्थ केली. त्यामुळे प्रवाशांनी धोकेदायक पद्धतीने वाहतूक करणार्या चालक आणि वाहकावर कारवाई करण्याची मागणी केली.
Subscribe to:
Posts (Atom)