Monday, 20 April 2020

“डॉक्टरांनी घाबरुन जाऊ नये. पीपीई किटचा पुरवठा लवकरच होईल”- मुख्यमंत्री

पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजे पीपीई किट पुरवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न शासनाकडून सुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील खासगी डॉक्टरांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे ज्या रुग्णांच्या काही जुन्या ट्रिटमेंट सुरु असतील त्यांच्यासाठी कुठलीही रुग्णालयं पूर्णपणे सुरु रहायला हवीत, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी रविवारी म्हणजे दुपारी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले

ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना राज्य सरकार देणार माफक स्वरुपातली परवानगी

राज्यभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 1 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यभरात होत असलेले उपचार व इतर गोष्टींबद्दल माहिती दिली. करोना हा आपला छुपा शत्रू असल्यामुळे त्याच्याविरोधात घरात राहूनच लढता येईल असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. लॉकडाउनच्या काळात राज्यातील अनेक उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे. करोनासोबतच या परिस्थितीकडेही लक्ष देणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नाहीतर करोनाच्या संकटातून बाहेर पडून आपण आर्थिक संकटात पडू असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

जागा निश्‍चित, तरीही हातगाड्या रस्त्यांवर

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी भाजीपाला विक्रेत्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने 46 ठिकाणी शहरभरात नियोजनबद्ध जागा निश्‍चित करून दिल्या. तरीही पोलिस व महापालिका प्रशासनाच्या वरचढ भाजीविक्रेते असल्याचे चित्र शहरभर आहे. रोज पोलिसांना हातात दंडुका घेऊन या भाजी विक्रेत्यांना शहाणपणाचे डोस पाजावे लागत आहेत. या भाजीविक्रेत्यांवर दंडुका तरी किती दिवस चालणार? असा प्रश्‍न उभा राहत आहे. 

#Lockdown2.0 : 'या' कारणांमुळे वाढतायेत मटण, चिकनचे दर

पिंपरी : कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे मासांहार करणाऱ्या खवय्यांकडून मटण आणि चिकनची मागणी वाढली आहे. त्यामुळे एक किलो मटणाच्या खरेदीसाठी 680 रुपये तर चिकनसाठी 240 रुपये मोजावे लागत आहेत. लॉकडाऊन होण्याअगोदर हे दर आटोक्‍यात होते. मात्र, आता प्रतिकिलोमागे त्याचे 100 ते 150 रुपयांनी वाढले आहेत. 

#Lockdown2.0 : उद्योग नगरीतच कामगार वेतनाशिवाय

पिंपरी : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची वेतन व मनुष्यबळ कपात करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र, त्याला खासगी कार्यालये आणि कंपन्या हरताळ फासत आहेत. लॉकडाऊनमुळे काही कंपन्यांनी कामगारांच्या खात्यावर संपूर्ण, तर काहींच्या खात्यावर निम्मे वेतन जमा केले आहे. परिणामी,  उद्योगनगरीतच अनेक कामगार वेतनाशिवाय असल्याची वस्तुस्थिती आहे.

तुम्ही आमचे धान्य विकून खाल्ले; दुकानदारांविरुद्ध केशरी शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी

पिंपरी : "आम्हाला धान्य मोफत मिळणार आहे. मात्र, रास्त भाव दुकानदारांनी आमचे धान्य विकून खाल्ले आहे. दुकानदार चोर आहे'',अशा स्वरुपाच्या शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी अन्नधान्य पुरवठा विभागाकडे येत आहेत. तसेच केंद्र सरकारकडून देशातील 80 कोटी जनतेला मोफत धान्य मिळणार असल्याचाही गैरसमज लोकांमध्ये पसरला असल्याने दुकानदार आणि अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांना शिधापत्रिकाधारकांना समजावून सांगताना नाकीनऊ येत आहे. 

…अन्यथा 1 मे पासून धान्य उचलणे बंद करू

  • माजी खासदार तथा रेशनिंग फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांचा इशारा
  • राजकीय हस्तक्षेप, बदनामी थांबवा