Tuesday, 17 July 2018

कचऱ्यावर प्रक्रियाच, डंम्पिंग यार्डला यापुढे परवानगी नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नागपूर : राज्यातील एकाही शहरात पुढे कचरा साठवण्यासाठी डंपिंग यार्डला मंजुरी दिली जाणार नाही. कचऱ्याचा पुनर्वापर प्रक्रियेशी संबंधित उद्योगाची उभारणी सर्वच ठिकाणी बंधनकारक केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे काम अद्याप अर्धवट

पिंपरी - प्राधिकरण, पेठ क्रमांक 26 येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या कामासाठी मुदतवाढ दिल्यानंतरही हे काम अद्याप अर्धवट आहे. 37.5 कोटी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या या नाट्यगृहाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड), आचार्य अत्रे रंगमंदिर (संत तुकारामनगर) ही नाट्यगृहे सध्या नूतनीकरणासाठी बंद आहेत. त्यामुळे सध्या नाटकांसाठी नटसम्राट निळू फुले रंगमंदिर (पिंपळेगुरव) आणि अंकुशराव लांडगे नाट्यगृह (भोसरी) ही दोनच नाट्यगृहे उपलब्ध आहेत. पर्यायाने, नाट्य कलाकार आणि नाट्यप्रेमींचा हिरमोड होत आहे. 

‘पवना’ ७० टक्के भरले

मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडची तहाण भागवणार्‍या पनवा धरण परिसरात गेल्या चोवीस तासांपासून  जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून, धरण 69.37 टक्के भरले आहे.  पवना धरण परिसरात बारा तासांत 135 मिलीमीटर पावासाची नोंद झाली आहे. तर परिसरात एक जूनपासून 1686 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. धरणाची पातळी 2007 फूट एवढी झाल्याची  माहिती धरणाचे शाखाधिकारी ए. एम. गदवाल यांनी दिली

Eminent citizens write to PM on road safety

Prominent among the 70 signatories to the letter are noted astrophysicist Jayant Narlikar, economist Vijay Kelkar, Thermax chairperson Meher Pudumjee, Rajya Sabha MP Anu Aga and actors Mohan Agashe and Naseeruddin Shah.

जिल्हाधिकार्‍यांचाही सहभाग

पिंपरी-चिंचवड शहरातील ‘हार्ट’ अशी ओळख असलेल्या पिंपरी कॅम्पातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मिलिटरी डेअरी फार्म उड्डाणपूला संदर्भात संरक्षण विभागाची रखडलेली मंजूरी शिवसेनेच्या दोन्ही खासदारांच्या प्रयत्नाने सोडविणे तसेच स्मशानभूमी ते सुभाषनगर हा विकास आराखडयातील रस्ता विकसित करावयास घेण्याच्या कामाला प्रारंभ करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. पिंपरी येथील सिंधी बांधवांना निर्वासित क्षेत्र जाहीर केल्यानंतर सनद देण्याबाबत महसुलमंत्र्यांच्या सुचनेनुसार नगरभूमापन अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयांच्यावतीने संयुक्त सर्व्हे करण्याच्या कामास पुढील आठवडयात सुरूवात करण्याचा निर्णय झाला. या बैठकीत दूरध्वनीवरून पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही सहभाग घेतला.

पाणी प्रश्नाबाबत आमदार लांडगे यांची मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक

पिंपरी-पिंपरी-चिंचवड शहरातील राज्य सरकारशी प्रलंबित प्रश्न आणि आंद्रा व भामा-आसखेड धरणातून शहरवासियांसाठी पाणी आणण्याची योजना तसेच रखडलेला बंद पवना जलवाहिनी प्रकल्प या महत्वाच्या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी येत्या शुक्रवारी 20 आणि शनिवारी 21 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व अधिका-यांसमवेत नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात बैठक आयोजित केली आहे.

पिंपरी चिंचवडच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलवली गुरूवारी बैठक

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वतंत्र बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवली आहे. ही बैठक गुरूवार दि.१९ व दि.२० जुलै रोजी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी बोलवली आहे. शहरातील प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. या बैठकीला चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बोलविले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.