पिंपरी - प्राधिकरण, पेठ क्रमांक 26 येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या कामासाठी मुदतवाढ दिल्यानंतरही हे काम अद्याप अर्धवट आहे. 37.5 कोटी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या या नाट्यगृहाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड), आचार्य अत्रे रंगमंदिर (संत तुकारामनगर) ही नाट्यगृहे सध्या नूतनीकरणासाठी बंद आहेत. त्यामुळे सध्या नाटकांसाठी नटसम्राट निळू फुले रंगमंदिर (पिंपळेगुरव) आणि अंकुशराव लांडगे नाट्यगृह (भोसरी) ही दोनच नाट्यगृहे उपलब्ध आहेत. पर्यायाने, नाट्य कलाकार आणि नाट्यप्रेमींचा हिरमोड होत आहे.

No comments:
Post a Comment