मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडची तहाण भागवणार्या पनवा धरण परिसरात गेल्या चोवीस तासांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून, धरण 69.37 टक्के भरले आहे. पवना धरण परिसरात बारा तासांत 135 मिलीमीटर पावासाची नोंद झाली आहे. तर परिसरात एक जूनपासून 1686 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. धरणाची पातळी 2007 फूट एवढी झाल्याची माहिती धरणाचे शाखाधिकारी ए. एम. गदवाल यांनी दिली
No comments:
Post a Comment