Friday, 12 October 2018

Happy Eating Spread Positivity; #PCMCEatOuts launched on 36th Anniversary of Pimpri-Chinchwad

On the great occasion of 36th Anniversary of Pimpri-Chinchwad, We city youth (#PCMCFirst) are delighted to announce that we have started #PCMCEatOuts. A facebook group to provide a platform for city based foodies

चाकणमध्ये इलेक्‍ट्रॉनिक हब होणार

चाकण - येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यासाठी शेतकऱ्यांच्या इच्छेने जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या पाचव्या टप्प्यात इलेक्‍ट्रॉनिक हब होणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी तीनशे एकर जमीन एका इलेक्‍ट्रिक कंपनीला देण्यात येणार आहे, अशी माहीती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख यांनी दिली. 

पिंपरीत पुढील वर्षी धावणार मेट्रो

पिंपरी-फुगेवाडी मार्ग डिसेंबर २०१९पर्यंत कार्यान्वित करण्याचा निर्धार

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी ते फुगेवाडी या प्राधान्य मार्गावर डिसेंबर २०१९ पर्यंत मेट्रो सुरू करण्याचा निर्धार 'महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन'ने (महामेट्रो) केला आहे. त्यामुळे, या मार्गावरील मेट्रो मार्गिकेच्या बांधकामासह स्टेशनच्या बांधकामाचे काम गतीने सुरू करण्यात आले आहे. पुढील वर्षभरात या मार्गावरील किमान पाच किलोमीटरचे काम पूर्ण करण्याचे आव्हान 'महामेट्रो'समोर असणार आहे.

...अन्‌ कॅरिबॅग विक्रेत्यांनी केले पलायन

पिंपरी - पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वस्तू व कॅरिबॅगवर राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी बंदी घातली आहे. तरीही शहरात त्यांचा वापर सर्रास होतो आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘कॅरिबॅग येतात कुठून?’ याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, काही जण शहरातील सिग्नलवर कॅरिबॅग विकत असल्याचे आढळले. त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी कॅमेरा काढताच, सर्वांनी कॅरिबॅग ठेवलेल्या पिशव्या घेऊन पळ काढला. साधारणतः दोन-अडीच तास सिग्नलवर कुणीही फिरकले नाही. सायंकाळी परिस्थिती जैसे-थे आढळली. ठिकाण होते महापालिका भवनाजवळील मोरवाडी चौक. प्लॅस्टिक व कॅरिबॅग बंदीबाबत महापालिकेने वेळोवेळी जनजागृती केली आहे. तरीही कॅरिबॅग आढळलेल्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला. तरीसुद्धा कॅरिबॅग मोठ्या प्रमाणात शहरात आढळत आहेत.

सिंधी बांधवांची आराध्य वैष्णोदेवी

पिंपरी – शहरातील वैष्णो देवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सावानिमित्त भावीक मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर शहराच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. पिंपरीतील वैष्णो देवी मंदिराची स्थापना 16 ऑक्‍टोबर 1193 साली हरिश मूलचंदानी यांनी केली. जम्मू-कश्‍मिरमध्ये त्रिकूट पर्वतावर वैष्णो देवीचे मूळ स्थान असून त्या पार्श्‍वभूमीवर या मंदिराची बांधणी येथे करण्यात आली आहे.

बिल न भरल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील फोनचे ‘आऊट गोईंग बंद’

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्या कार्यालयातील फोनचे बिल भरले न गेल्याने आऊटगोईंग बंद झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे. वाहन, कर्मचाऱ्यांचा तुटवडा एकीकडे असताना आता आयुक्तालयातील फोनचे आऊटगोईंग बंद झाल्याने पोलीस आयुक्तालयात सुरू करण्याची घाई झाल्याची चर्चा सुरू झालीयं…

शहराचा ‘डीपीआर’ तयार करण्यासाठी दोन एजन्सी पात्र : आयुक्तांच्या निर्णयानंतर ‘स्थायी’कडे शिफारस

पिंपरी-चिंचवड शहराचा सुधारीत विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेसह एका खासगी एजन्सीचा प्रस्ताव पात्र ठरला आहे. त्यासंदर्भातील अहवाल नुकताच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सादर केला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर सदर प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवला जाणार आहे.