पिंपरी - पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वस्तू व कॅरिबॅगवर राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी बंदी घातली आहे. तरीही शहरात त्यांचा वापर सर्रास होतो आहे. या पार्श्वभूमीवर ‘कॅरिबॅग येतात कुठून?’ याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, काही जण शहरातील सिग्नलवर कॅरिबॅग विकत असल्याचे आढळले. त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी कॅमेरा काढताच, सर्वांनी कॅरिबॅग ठेवलेल्या पिशव्या घेऊन पळ काढला. साधारणतः दोन-अडीच तास सिग्नलवर कुणीही फिरकले नाही. सायंकाळी परिस्थिती जैसे-थे आढळली. ठिकाण होते महापालिका भवनाजवळील मोरवाडी चौक. प्लॅस्टिक व कॅरिबॅग बंदीबाबत महापालिकेने वेळोवेळी जनजागृती केली आहे. तरीही कॅरिबॅग आढळलेल्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला. तरीसुद्धा कॅरिबॅग मोठ्या प्रमाणात शहरात आढळत आहेत.

No comments:
Post a Comment