पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेला “स्मार्ट सिटी’ अंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून 207 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यापूर्वी देखील 84 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, खर्च करण्यासाठी महापालिका प्रशासन कमी पडत आहे. हा निधी खर्च करावा, अशा सूचना देखील केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 11 December 2018
डिजीटल घड्याळ खरेदीवरुन “टिकटिक’
पिंपरी- शहर स्वच्छतेचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने होण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेने 7 कोटी खर्चून सफाई कामगारांच्या मनगटावर बांधण्यात येणारी 4 हजार 544 “स्मार्ट वॉच’ थेट पद्धतीने भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव उद्या (दि.11) होणाऱ्या स्थायी सभेच्या मान्यतेकरिता ठेवला आहे. प्रशासनाकडून मांडलेल्या या विषयामुळे सत्ताधारी भाजपबरोबरच विरोधक देखील हैराण झाले आहेत. आता या विषयाबाबत सत्ताधारी भाजप पदाधिकारी नेमकी काय भुमिका घेतात, याकडे स्वकीयांबरोबरच विरोधकांचे देखील लक्ष लागले आहे.
अजित पवारांचे शहरातील दौरे वाढले
पिंपरी –लोकसभा निवडणूक जवळ येत चालली असताना, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा शहराबरोबरच मावळ लोकसभा मतदार संघात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. 11) आयोजित केलेल्या संविधान सन्मान सोहळा व संविधान प्रबोधन मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी व आकुर्डी न्यायालयात शेकडो खटले निकाली
पिंपरी (Pclive7.com):- पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी व पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. 8 डिसेंबर) पिंपरी न्यायालयात व आकुर्डी मनपा न्यायालय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेकडो खटले निकाली काढण्यात आले.
फेरीवालाबाबत राज्यभरातील महापालिका स्थितिनिर्देशांक तयार करणार
एमपीसी न्यूज – महाराष्ट्र हॉककर्स फेडरेशन आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघा तर्फे एकदिवशिय फेरीवाला कायदा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन खारघर नवी मुंबई येथे करण्यात आले.यावेळी कायदा अमलबजावणीसाठी रस्त्यावरची लढाईसह सर्व पर्यायी मर्गांचा अवलंब करण्याचा ठराव करत राज्यातील सर्व महानगरपालिकात फेरीवाला कायद्याबाबतचि परिस्थितिचा निर्देशांक तयार करण्याचा निश्चय करण्यात आला .
कुदळवाडी परिसरात पथदिवे चकाचक
एमपीसी न्यूज – कुदळवाडी परिसरात बऱ्याच दिवसांपासून विद्युत पोलवरील दिवे बंद व नादुरुस्त झाले होते. याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाकडे पथदिवे दुरुस्तीबाबत पाठपुरावा चालू होता. स्विकृत सदस्य दिनेश यादव यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे.
राज्य नाट्यच्या निकालावर रंगकर्मींची नाराजी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड विभागात पार पडलेली 58 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा यंदा चांगलीच चर्चेत राहिली. स्पर्धेचे स्थळ म्हणून निवडलेल्या आणि नुकत्याच नुतनीकरण झालेल्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे स्पर्धा चर्चेत होती. त्यातच स्पर्धेच्या अनपेक्षित निकालानंतर प्रेक्षक आणि रंगकर्मींच्या रोषामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)