Thursday, 21 June 2012

पोलिसांना लागेना शहाचा थांगपत्ता

पोलिसांना लागेना शहाचा थांगपत्ता: उद्योगनगरीतील सराफांना गंडविणारा फरार

पिंपरी/सांगवी । दि. ६ (प्रतिनिधी)

सराफांना सुमारे दोन कोटींचा गंडा घालणार्‍या ठकसेन विरल शहाचा २४ तासांनंतरही थांगपत्ता लागलेला नाही. त्याची ‘फ्युचर व्हीजन इन्व्हेस्टमेंट’ ही संस्था बनावट असून, त्यांच्या कार्यालयातून मिळालेल्या पारपत्रावरून तो अहमदाबादचा आहे, एवढीच माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, ते पारपत्र खरे आहे की खोटे आहे, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, शहाची भाडेकरू म्हणून सांगवी पोलिसांकडे नोंदच नाही. तो नोंदणीसाठी आला होता. मात्र, कागदपत्रे अपुरी असल्याने त्याला परत पाठविल्याचे पोलीस बिनदिक्कतपणे सांगत आहेत.

No comments:

Post a Comment