आशिष शर्मा ऊर्जा खात्यात:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त आशिष शर्मा यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील ऊर्जा खात्यात बदली झाली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना बरीच ‘प्रतीक्षा’ करावी लागली. उद्या (शुक्रवारी) ते मुंबईत नवा पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात येते. अजित पवार पिंपरी-चिंचवडचे कारभारी आहेत. शर्मा यांनी तेथे चार वर्षे चांगल्या पद्धतीने काम केले, अशी कामाची पावती देत अजितदादांनीच आपल्याकडील ऊर्जाखात्यात त्यांची वर्णी लावून घेतल्याचे मानले जाते.मे २००८ मध्ये शर्मा पिंपरी पालिकेच्या आयुक्तपदावर रूजू झाले होते.
Read more...
No comments:
Post a Comment