अनधिकृत ५३ मोबाईल टॉवरवर कारवाई: पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने अनधिकृतपणे उभारलेल्या ५३ मोबाईल टॉवरवर कारवाई केली जाणार आहे. सर्वाधिक टॉवर भोसरी परिसरात आहेत. त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना प्राधिकरणाने महावितरणला केली आहे. तसेच टॉवर मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
प्राधिकरणाच्या एक ते चाळीस पेठांमध्ये अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. प्राधिकरण व महापालिकेची परवानगी न घेताच त्याची उभारणी करून पैसे कमविण्याचा धंदा केला जात होता.
No comments:
Post a Comment