‘घरकुल’ मोर्चासाठी नेते उकळतात पैसे: पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)
‘घरकुल’ प्रश्नावर काही संघटना लाभार्थींची दिशाभूल करीत आहेत. लाभार्थींनी कोणीही संघटनांकडे धाव घेतली नसताना काहीजण स्वयंस्फूर्तीने घरकुलासाठी लढा देत आहेत. काहींचा उद्देश केवळ पैसा कमविणे हा आहे. आंदोलन, मोर्चासाठी पावत्या फाडून लाभार्थींकडून पैसे वसूल केले जातात. घरकुलाच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची वेळ आली की, वेगळीच मागणी करून त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न होत आहे, असा सनसनाटी आरोप एक घरकूल लाभार्थी दगडू वाकचौरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. याच निवेदनाद्वारे त्यांनी काल (गुरुवार) महापालिका आयुक्तांसमोर संघटनांच्या नेत्यांमध्ये भांडणे कशी जुंपली याचाही भांडाफोड केला आहे.
No comments:
Post a Comment