धमकीचे पत्र म्हणजे खोडसाळपणा: पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना निनावी पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देणे खोडसाळपणा असावा, असा सर्वसाधारण सूर आहे. अशा प्रकारच्या धमक्यांची पोलीस दफ्तरी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद होत असली, तरी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन तपासाची चक्रेही वेगाने फिरविली आहेत. या प्रकरणातील ठोस माहिती लवकरच हाती लागेल, असा विश्वासही सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे.
No comments:
Post a Comment