राष्ट्रवादीच्या विभागीय समन्वयक प्रदेश सरचिटणीसपदी यशवंत भोसले
पिंपरी, 27 जुलै
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरेदाखल होवून चार वर्षे उलटल्यानंतर माजी नगरसेवक तथा कामगार नेते यशवंत भोसले यांना राष्ट्रवादीने विभागीय समन्वयक कार्यकारिणीच्या प्रदेश सरचिटणीसपद बहाल केले आहे. पिंपरी-चिंचवडपासून दूर ठेवत त्यांना पुणे ग्रामीण आणि सोलापूरचा कार्यभार देण्यात आला आहे. यशवंत भोसले यांनी शुक्रवारी (दि. 27) पत्रकार परिषदेत नियुक्तीविषयीची माहिती दिली. मात्र यावेळी एकही स्थानिक नेता उपस्थित नव्हता.
No comments:
Post a Comment