दुष्काळामुळे सोनसाखळी चोरीचे ...:
पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांचे वक्तव्य
पिंपरी / प्रतिनिधी - गुरुवार, २६ जुलै २०१२
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सोनसाखळी चोरांनी उच्छाद घातला असताना आणि त्यांना पायबंद घालण्यात पुरेसे यश न आलेल्या पोलिसांनी अखेर त्याचे खापर दुष्काळी परिस्थितीवर फोडले आहे. पाऊस कमी पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सोनसाखळी चोरीचे गुन्हे वाढत असल्याचे विधान खुद्द पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनीच बुधवारी भोसरीत पत्रकारांशी बोलताना केले. सोन्याची किंमत वाढते आहे आणि महिला एकटय़ा-दुकटय़ाने फिरतात, अशा अन्य कारणांची जोडही त्यांनी या वेळी दिली.
पोलीस आयुक्त झाल्यानंतर पोळ यांनी पोलीस ठाण्यांना भेट देण्याचा कार्यक्रम आखला आहे.
Read more...
No comments:
Post a Comment