Monday, 10 September 2012

'डीपी'च्या योग्य अंमलबजावणीने पिंपरी-चिंचवडचेही सिंगापूर

'डीपी'च्या योग्य अंमलबजावणीने पिंपरी-चिंचवडचेही सिंगापूर: 'डीपी'च्या योग्य अंमलबजावणीने पिंपरी-चिंचवडचेही सिंगापूरशहर विकास आराखडा (डीपी) म्हणजे नगरीचा चेहरा. भविष्यातील लोकसंख्यावाढ गृहीत धरून पंचवीस-तीस वर्षांचे नियोजन त्यातून होते. हे नियोजन व उद्योगनगरीचा चेहरा जनतेला पुरेसा ज्ञात नव्हता. हे काम फक्त पुढाऱ्यांचे आहे; हा आपला प्रांतच नाही, इतके लोक फटकून असतात. त्यामुळे आराखडा, त्यातील आरक्षणे कोणती, ताब्यात किती, विकसित-अविकसित किती, बदलली किती, त्यांच्या सद्यःस्थितीचा लेखाजोखा आजवर गुलदस्तात होता. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी प्रथमच ही सर्व माहिती पालिकेच्या वेबसाइटवर (www.pcmcindia.gov.in) जनतेसाठी खुली केली आहे. त्यातून कटू सत्य समोर आले. विकास आराखड्याची कासवगती लोकांसमोर आली. किमान यापुढे प्रत्येक नगरसेवकाला आपल्या वॉर्डमधील आरक्षणांची जाण असावी. करदात्या नागरिकांनीसुद्धा त्यात लक्ष घातले पाहिजे. "डीपी'चे अर्थकारण, राजकारण, समाजकारण समजून घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पारदर्शक कारभार व विकासकामांमध्ये लोकसहभाग वाढावा, हा याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नगरसेवकांवर जनतेचाही अंकुश राहू शकतो. ही माफक अपेक्षा ठेवायला हरकत नाही. 

No comments:

Post a Comment