गणेशोत्सवातून सामाजिक प्रश्नांचा वेध
पिंपरी, 6 ऑगस्ट
समाजात घडणा-या घडामो़डींचे पडसाद जसे नाटक सिनेमासारख्या गोष्टींवर त्वरित उमटतात. तसेच ते सार्वजनिक उत्सवांमधून सादर केल्या जाणा-या कार्यक्रमांमधून दिसून येतात. अशा घडामोडीतून समाजावर होणा-या चांगल्या वाईट परिणामांची कल्पना देऊन जनजागृती करण्याची संधी मिळते ती सार्वजनिक गणेशोत्सवांमधून. परंतु अशी जनजागृती मनोरंजनाच्या माध्यमातून झाली तर ती जनमानसाला अधिक भिडते. यंदाच्या गणेशोत्सवात अशा सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्याची, देखावे सादर करण्याची संधी पिंपरी-चिंचवड मधील सार्वजनिक गणेश मंडळांकडून घेतली जात आहे हे गणेशोत्सवाच्या तयारीतून दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment