सुरक्षितताच 'गॅस'वर !
तळेगावजवळ माळवाडी येथे गॅस टँकरने पेट घेतला तेव्हा पाच किलोमीटर अंतरावरील तळेगावमधून आगडोंब दिसत होते. खंडाळ्यात गॅस टँकरला अपघात झाल्यामुळे गॅस गळती सुरू झाल्याची 'ब्रेकिंग न्यूज' एमपीसी न्यूजच्या माध्यमातून समजली, तेव्हा डोळ्यासमोर आला माळवाडीतील गॅसचा आगडोंब. अपघात खंडाळा गावात झालेला असल्याने पोटात धस्स झाले. काही केल्या गॅसगळती थांबत नव्हती. खंडाळ्यातील रहिवाशांची सुरक्षितता अक्षरशः 'गॅस'वर होती. माळवाडी येथे झालेल्या अपघातानंतर पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव येथेही गॅसगळतीची दुर्घटना घडली होती. मागील महिन्यात निगडीजवळ देहूरोड जकातनाका येथे अतिज्वालाग्राही रसायनाची गळती झाली होती. खंडाळ्याच्या दुर्घटनेनंतर दोनच दिवसांत देहूरोड येथे गॅस टँकर उलटला. तेव्हाही परिसरातील रहिवासी 'गॅस'वर होते.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
No comments:
Post a Comment