लाखो लिटर पाणी वाया: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)
जलवाहिनी स्वच्छ करण्यासाठी पाणी सोडल्याने थरमॅक्स चौक ते आकुर्डी दरम्यानच्या रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. शहरात एकीकडे पाणी मीटरने दिले जात असताना अशा प्रकारे झालेल्या पाण्याच्या अपव्ययास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एमआयडीसी परिसरात थरमॅक्स चौकाजवळ पाणीपुरवठा करणार्या वाहिनीला नवीन वाहिनी जोडण्यात आली आहे. त्यामुळे वाहिनी स्वच्छ करण्यासाठी पाणी सोडून देण्यात आले. दुपारी दोन वाजल्यापासून लाखो लिटर पाणी सोडले. रस्त्यावर पाणी आल्याने दोन्ही दिशेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. एमआयडीसीच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
- थरमॅक्स चौक ते आकुर्डी या रस्त्यावरील गटारीच्या चेंबरमधून निघून रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे आकुर्डीहून थरमॅक्स चौकाकडे जाणा-या रस्त्याची एक बाजू पुर्णपणे पाण्यानी भरली होती. या पाण्याच्या अपव्ययाला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक करत होते.
No comments:
Post a Comment