विवाहितेला पेटविणार्या तिघांना अटक: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)
निगडीतील ओटास्कीम येथे विवाहितेचे हातपाय बांधून तिला पेटविल्याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू आणि सासर्याला अटक केली आहे. विवाहितेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बाळासाहेब राजाभाऊ गालफाडे (२८), राजाभाऊ धोंडीबा गालफाडे (५५) आणि सविता राजाभाऊ गालफाडे (५0, तिघेही रा. विठ्ठल हौसिंग सोसायटी,ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विवाहितेला जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. प्रियंका गालफाडे (२२) असे विवाहितेचे नाव आहे.
No comments:
Post a Comment