Tuesday, 18 September 2012

फुलांची आवक मंदावली; भाजीपाला महाग

फुलांची आवक मंदावली; भाजीपाला महाग: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)

गेल्या आठवड्यातील भाजीपाल्याचे दर ३ ते ५ रुपयांनी वाढले आहेत. फळभाज्याचे दर स्थिर असून, टोमॅटोची घसरण झाली असून ते ५ ते १0 रुपये किलो होता. डाळींब व सीताफळाचे दर २0 ते ३0 रुपयांनी वाढ झाली आहे. फुलांचे भाव सध्या स्थिर असून, आवक मंदावल्याने तसेच, गणेशोत्सवामुळे मागणी वाढल्याने दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

आवक मंदावल्याने भाजीपाल्याचे दर काहीसे वाढले आहेत. मेथी १0 ते १२, शेपू ५, कोंथिबीर १२ ते १५, पालक, कांदापाला १0 रुपये जुडी असा दर होता. मटार ५0 ते ६0, राजमा ४0, काळा घेवडा ४0 रुपये किलोने कायम होता. टोमॅटो ५ ते १0, बटाटा १८ ते २0, कांदा १0 ते २0, लसूण २0 ते ४0, वांगी २५, भेंडी २५, काकडी १0 ते १४, शेवगा ३0, घेवडा २0, मिरची १५ ते २0, सिमला मिरची ४0, कोंबी १२, गाजर ३0, तोडली ३0, कारले २५ ते ३0, प्लॉवर २0, भोपळा २0, रताळी ६0 रुपये किलो दर होता.

सीताफळ महागले मोसंबी १0 रुपयांनी महागली. डाळींब १00 ते १४0, सीताफळ ८0 ते १४0 रु. किलो दर आहे. सफरचंदाची मोठय़ा प्रमाणात कायम असल्याने ८0 ते १00 रुपये दर स्थिर होता. पपई २५ ते ३0, कलींगड १५ ते २0, खरबूज ३0, परदेशी संत्री १00 रुपये किलो आहे.

फुलांचे दर वाढण्याची शक्यता: गणेशोत्सव व गौरी गणपती सणामुळे फुलांची मागणी येत्या दोन दिवसांत मोठी वाढणार आहे. मात्र, पावसामुळे फुलांचे माल खराब झाल्याने त्यांची आवक मंदावली आहे. मागणीत वाढ होऊन दर वाढण्याची शक्यता विक्रेते विकास जाधव यांनी व्यक्त केली. गुलछडी २00 ते ३00, झेंडू २0 ते ५0, कोलकत्ता (पिवळा व लाल) झेंडू ४0 ते ५0 रुपये किलो दर होता. साधी गुलाब गडी २0 ते ३0, डच गुलाब गडी १00 ते १५0, जरबेरा ४0 ते ६0, अँस्टर २0 (शेकडा), गोल्डन शेवंती ८0 ते १00, पांढरा शेवंती १00 ते १५0, लिली गडी २0 ते ३0, गजरा गडी १५0 ते २00 रुपये दर आहे.

No comments:

Post a Comment