एक होतं तळं... संपादकीय
अंतराळातील एक-एक ग्रह जिंकत तो 'सुपरहिरो' पृथ्वीवर आला. मात्र, पृथ्वीवर राज्य करायचं नाही, असं तो म्हणू लागला. कारण काय तर, पृथ्वीवर दोन तृतीयांश पाणीच आहे. एक तृतीयांश जमिनीवर मी काय राज्य करणार ? त्यावेळी आजच्या सारखे विद्वान पाहिजे होते, त्यांनी समुद्र बुजवून जमीन वाढविण्याची भन्नाट कल्पना त्याच्या डोक्यात घुसवली असती. जमिनीची कोट्यवधी रुपयांची किंमत कळल्यानंतर लक्ष्मी घरी पाणी भरू लागते, त्यामुळे मग बाहेरच्या पाण्याच्या स्रोतांना, जलाशयांना त्यांच्या लेखी काय किंमत उरणार ? नदीचं पात्र बुजविणारी ही जमात छोट्या-मोठ्या तळ्याचा तो काय विचार करणार ? तळं राहिलं तर फायदा कोणाला ? मात्र तळं बुजवलं तर कोट्यवधींचा फायदा, काहीजणांची तरी 'गरिबी' नक्कीच दूर होणार !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
No comments:
Post a Comment