गृहमंत्र्यांनी साधला कैद्यांशी संवाद: पिंपरी । दि. ९ (प्रतिनिधी)
साहब, मुझे छोडने को बोलो ना, इन पुलीस लोगों को. कब से बंद कर के रखा है. क्यूॅँ? बाहर निकल के तुम्हे चोरीयों की सेन्च्युरी पुरी करनी है क्या? हा संवाद आहे राज्याचे दस्तुरखुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील आणि घरफोड्यांतला अट्टल आरोपी पापासिंह टाक दुधानी यांच्यातील.
ठिकाण आहे भोसरी पोलीस ठाणे. गृहमंत्री पाटील यांनी रविवारी दुपारी भोसरी पोलीस ठाण्याला धावती भेट दिली. कर्मचार्यांशी हितगूज साधतानाच त्यांनी पोलीस कोठडीतील आरोपीशी देखील संवाद साधला. पोलीस ठाण्यात होणार्या आधुनिकीकरणाचीही त्यांनी माहिती घेतली.
No comments:
Post a Comment