Thursday, 13 September 2012

पिंपरी-चिंचवड शहर बंद - कौल जनतेचा | Pimpri Chinchwad Shutdown - Citizen poll

पिंपरी चिंचवड शहरात चाललेल्या अनियमित बांधकामाबाबत सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना, भाजप, आरपीआय, मनसे, नागरी हक्क सुरक्षा समिती यांच्या वतीने दि. २३ ऑगस्ट २०१२ रोजी मनपा कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चाच्या दरम्यान अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नाकडे राज्यशासनाचे लक्ष वेधून अनधिकृत बांधकामाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर बंद करणार असल्याची घोषणा केली होती. या बंदमध्ये नागरिकांचा सहभाग असणे जरुरीचे आहे. म्हणून नागरिकांच्या प्रतिक्रिया मतदानाद्वारे जाणून घेण्यासाठी ५०००० पेक्षा जास्त नागरिकांचे विभागवार मतदान गुरुवार दि. १३ सप्टेंबर २०१२ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ या वेळेत घेणार आहे. या मतदानाच्या निकालानंतर नागरिकांच्या मागणीनुसार पिंपरी चिंचवड शहर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. * जर आपणास आपल्या जवळील मतदान केंद्रावर जाऊन मत देणे शक्य न झाल्यास, आपण ऑनलाईन पद्धतीने मत नोंदवू शकता.

आपले नम्र, शिवसेना, भाजप, आरपीआय, मनसे, नागरी हक्क सुरक्षा समिती

For online voting visit https://docs.google.com/spreadsheet/viewform?fromEmail=true&formkey=dFZNZDRyNHBya0hDNlU1VlBHV1pzTXc6MQ

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment