Saturday, 13 October 2012

बांधकामावरील दंड आकारणीचा प्रस्ताव

बांधकामावरील दंड आकारणीचा प्रस्ताव: पिंपरी । दि. १२ (प्रतिनिधी)

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी महापालिकेने प्रस्तावित केलेला ५00 रुपये प्रतिचौरस फूट दर नागरिकांना परवडणारा नाही. त्यामुळे दंड आकारणीचा फेरप्रस्ताव प्रशासनाने महापालिका सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे.

३ हजार चौरस फुटांपर्यंत २५ रुपये प्रति चौरस फूट दंड आकारणी करावी. ३ ते ५ हजार चौरस फुटांपर्यंत ५0 रुपये प्रति चौरसफूट, ५ ते १0 हजार चौरस फुटांपर्यंत १00 रुपये प्रतिचौरस फूट, १0 हजार चौरस फुटांपर्यंत ५00 रुपये प्रतिचौरस फूट दंडआकारणी करावी, असा फेरप्रस्ताव मंजुरीसाठी सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.

बांधकामे नियमितीकरणासाठी सरसकट ५00 रुपये चौरसफूट याप्रमाणे दंड आकारणीचा प्रस्ताव प्रशासनाने ठवेला होता. त्यात सुधारणा सुचविणारा प्रस्ताव शहरसुधारणा समितीमार्फत सर्वसाधारण सभेपुढे आला आहे.
यापुढे अनधिकृत बांधकामांना सुविधा न पुरविण्याचा प्रस्तावसुद्धा सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकामांची नळजोड, सांडपाणी व्यवस्था खंडित करण्याचे धोरण आगामी काळात महापालिकेतर्फे राबवले जाणार आहे.

महापालिका अस्थापनातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. तसेच शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या प्रशासन अधिकारी आशाराणी पाटील यांना एक वर्ष मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव येत्या महापालिका सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. पदोन्नती समितीने केलेल्या शिफारसीनुसार या पदासाठी अर्हता धारण केलेले डॉ. साळवे हे एकमेव वैद्यकीय अधिकारी आहेत.

No comments:

Post a Comment