Wednesday, 30 January 2013

2 मराठी अभिनेत्यांसह तिघे जखमी

2 मराठी अभिनेत्यांसह तिघे जखमी: पिंपरी। दि. 28 (प्रतिनिधी)

मुंबईहून-पुण्याकडे जाणारी भरधाव मोटार दुभाजक तोडून विरुद्ध लेनवरून रस्त्यालगतच्या खड्डय़ात पडली. सोमवारी रात्री साडेनऊला कामशेत बोगद्याजवळ झालेल्या अपघातात 3 जण जखमी झाले आहेत. यात चरित्र अभिनेते अभय राणो, विनोदी अभिनेते भालचंद्र (भाऊ) कदम, चालक उमेश शिंदे यांचा समावेश आहे. सकाळी झालेल्या अपघाताच्या ठिकाणापासून एक कि.मी.वर हा अपघात झाला.

राणो व कदम हे महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘कोकणस्थ’ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी निघाले होते. हे तिघे इंडिकाने पुण्याकडे जात असताना रात्री कामशेत बोगद्याजवळ आले. किलोमीटर 72.8क्क् जवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजक तोडून लेनवरून कोलांटउडय़ा घेत खड्डय़ात गेली. वैद्यकीय पथकाने त्यांना गाडीतून बाहेर काढले. जखमींना निगडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या जीवितास कोणताही धोका नाही.

No comments:

Post a Comment