बलात्कारापूर्वी महिलेला पाजली होती दारू: पिंपरी। दि. 28 (प्रतिनिधी)
भोसरीत रविवारी उघडकीस आलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात अपहरण करून शाळेच्या टेरेसवर नेल्यानंतर संबंधित महिलेला आरोपींनी दारू पाजली. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने दोन वेळा बलात्कार करण्यात आला होता.
या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. रमेश ब्रिजमोहन कोटार आणि राजुप्रसाद जगमोहन कोटार (दोघेही रा. उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. एका 35 वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पांजरपोळ परिसरातील एका बांधकाम साइटवर आरोपी रखवालदार म्हणून काम करायचे. पीडित महिलेचा पतीही तेथेच रखवालदार आहे. तो रात्रपाळीत कामावर गेला असता दोघे रखवालदार त्याच्या घरी आले व महिलेचे अपहरण करून तिला शाळेच्या टेरेसवर नेले. दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला.
No comments:
Post a Comment