‘स्थायी’चे 8 सदस्य आज बाहेर: पिंपरी । दि. 28 (प्रतिनिधी)
स्थायी समितीच्या 16 पैकी 8 सदस्यांना चिठ्ठय़ांद्वारे निवृत्त केले जाणार आहे. नेमके कोणाला बाहेर पडावे लागणार, याबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे, तर विद्यमान सदस्यांमधील प्रत्येकाला चिठ्ठीत आपले नाव यायला नको, असे वाटू लागले आहे. मंगळवारी दुपारी 3 ला होणा:या बैठकीत चिठ्ठय़ा काढल्यानंतर 8 जणांना बाहेर पडावे लागणार आहे.
आर्थिक मंजुरीचे अधिकार असलेल्या स्थायी समितीत अधिकाधिक कालावधीसाठी काम करण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु प्रक्रियेला सामोरे जाऊन नशिबावर हवाला ठेवण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही.
महापालिका निवडणुकीनंतर स्थायी समिती स्थापन होते. पक्षीय बलाबलानुसार सदस्य संख्या निश्चित करून सदस्यांची निवड केली जाते. पहिले वर्ष संपुष्टात येताच चिठ्ठय़ा काढून 8 सदस्य निवृत्त केले जातात. ज्या पक्षाचे सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर पडतील, त्या पक्षाचे नवीन सदस्य निवडले जातात. ही प्रक्रिया स्थायी समितीचे पहिले वर्ष संपुष्टात येताच होते.
No comments:
Post a Comment