Friday, 25 January 2013

उड्डाणपुलाच्या कामासाठी डांगेचौकातील वाहतुकीत बदल

उड्डाणपुलाच्या कामासाठी डांगेचौकातील वाहतुकीत बदल
पिंपरी, 23 जानेवारी
औंध-रावेत रस्त्यावरील डांगे चौकातील उड्डाणपुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी डांगेचौकातून होणा-या वाहतुकीत 24 व 25 जानेवारीला तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येणार आहे. या दोन्ही दिवशी नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डांगेचौकामध्ये उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरु आहे. त्याअंतर्गत 24 व 25 जानेवारीला उड्डाणपुलावर 25 मीटर लांबीचे गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी 24 जानेवारीला रात्री नऊ वाजता या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच 25 आणि 26 जानेवारीलाही मार्ग वाहतुकीस काही काळ बंद राहील.

चिंचवडहून डांगे चौकमार्गे काळेवाडी फाटा-जगताप डेअरी औंध-पुणेकडे जाणार्‍या वाहनांनी थेरगाव फाटा येथे डावीकडे वळून काळेवाडी फाटा येथे औंध रस्त्यास मिळावे, असा बदल सुचविण्यात आला आहे. हिंजवडीकडून डांगे चौकमार्गे काळेवाडी फाटा- जगताप डेअरी औंध-पुणेकडे जाणार्‍या वाहनांनी डांगे चौकातून सरळ पुढे जाऊन थेरगाव फाटा येथे उजवीकडे वळावे व काळेवाडी फाटा येथे जावे, असा आणखी एक बदल सुचविण्यात आला आहे.

त्याचबरोबर रावेतकडून येणार्‍या वाहनांनी डांगे चौक येथे डावीकडून वळून थेरगाव फाटा येथे उजवीकडे वळावे व काळेवाडी फाटा येथे मुख्य रस्त्यास मिळावे. अशा प्रकारे थेरगाव डांगे चौकातील वाहतूक मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करुन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पोरेड्डी यांनी केले आहे.
--------------------------------------

No comments:

Post a Comment