Friday, 25 January 2013

छाजेड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रजासत्ताक दिनी 'ए वतन तेरे लिए'

छाजेड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रजासत्ताक दिनी 'ए वतन तेरे लिए'
पिंपरी, 21 जानेवारी
प्रजासत्ताक दिनानिमित्त छाजेड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सागर आठवाल प्रस्तुत 'ए वतन तेरे लिए' हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम येत्या शनिवारी (दि. 26) रात्री नऊ वाजता चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे.

महाराष्ट्र सराफ स्वर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष रमेश सोनिगरा, बंट समाज सरंश्रक विश्वनाथ शेट्टी, सराफ स्वर्णकार फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य दिलीप सोनिगरा, उद्योगपती प्रकाश जैन, सामाजिक कार्यकर्ता विपुल वाढीया, अनिल मेहता, हितेश दोशी हे कार्यक्रमाचे प्रायोजक असून त्यासोबतच एमपीसी न्यूज, साप्ताहिक पिंपरी चिंचवड अंतरंग व शहरातील एकमेव मराठी न्यूजपोर्टल mpcnews.in माध्यम प्रायोजक म्हणून आहेत.
या कार्यक्रमाच्या प्रवेशिका छाजेड चॅरिटेबल ट्रस्ट, 6 प्रेस्टीज कॉम्प्लेक्स, चिंचवड स्टेशन तसेच एमपीसी न्यूज, पिंपरी-चिंचवड इन्फोमिडिया प्रा. लि., 31 भक्ती कॉम्प्लेक्स, डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या मागे, खराळवाडी, पिंपरी या ठिकाणी उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी 9970411000 किंवा 9503311000 या क्रमांकावर संपर्क साधावा. या कार्यक्रमाला रसिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष लखपतराज मेहता, उपाध्यक्ष विरेन शेट्टी व सचिव अल्पेश मेहता यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment