एचएची जागा विक्रीचा घाट: पिंपरी। दि. ५ (प्रतिनिधी)
एचए कंपनीची मोक्याची जागा विकण्याचा घाट घातला असून, २६ एप्रिलपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत. ज्या वेळी कंपनी आर्थिक संकटात सापडते, त्या वेळी जागेच्या विक्रीचा प्रयत्न होतो.आर्थिक संकटातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कंपनीची सुमारे सहा एकर जागा विक्रीस काढल्याने कामगार वर्गात खळबळ उडाली आहे. शहरात औद्योगिकीकरणाची महूर्तमेढ रोवणार्या एचए कंपनीची १0 मार्च १९५४ ला स्थापना झाली. पेनिसिलिन उत्पादनात अग्रेसर असलेली व केंद्र शासनाचा अंगीकृत व्यवसाय असलेली कंपनी १९९८ मध्ये आर्थिक डबघाईला आली.
No comments:
Post a Comment