Sunday, 7 April 2013

पिंपरीत दुकाने बंद ठेवण्यासाठी दमदाटी

पिंपरीत दुकाने बंद ठेवण्यासाठी दमदाटी पिंपरी - एलबीटीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी बुधवारी (ता. 3) सलग तिसऱ्या दिवशी बंद पाळला. काही दुकानदारांनी आपली दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बंद फसण्याची चिन्हे दिसू लागल्याने तिसऱ्या दिवशी शहराच्या प्रत्येक भागात दुचाकीवरून किंवा पायी फेरी काढून दुकान सुरू ठेवणाऱ्यांना दमबाजी करण्यात आली. काही ठिकाणी दुकानांवर दगडफेकही झाली. जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करणारी दुकानेही जबरदस्तीने बंद करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या या कृतीमुळे सर्वसामान्य वेठीस धरले जाऊ लागले आहेत. सर्वसामान्यांचे हाल होत असताना प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. 

No comments:

Post a Comment