थर्मोकोल प्रकल्प फाईल बेपत्ता: पिंपरी । दि. १३ (प्रतिनिधी)
थर्मोकोलवर प्रक्रिया करण्यासाठीच्या प्रकल्पाची फाईल महापालिकेला १0 वर्षांपूर्वी सादर केली होती. महापालिकेच्या विविध विभागांत चौकशी करूनही या फाईलचा ठावठिकाणा लागत नाही. याबाबत प्रशासनाच्या या बेजबाबदारपणावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे करण्यात आली आहे.
फुकटात उपलब्ध कच्चा माल व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी महिलांना करण्यायोग्य असा पुनर्निर्मिती प्रकल्प सुरू करण्याची योजना तयार केली, पण त्यात काही भांडवली गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अनुभवी व्यक्तीच्या शोधात थोडा वेळा गेला. राजकारणी नेतृत्वास आर्थिक उलाढालीची कल्पना आली, तेव्हा या प्रकल्पाची सुरुवात नागरवस्ती विभागातर्फे महिला उद्योग नावाने करण्यात आली. त्यासाठी महिला गटाच्या नावे योजना, सरकारी कर्ज, महापालिका अनुदान, खास सवलती, प्रशासनाची सहानुभूती व राजकीय पाठबळ होते, असे पर्यावरण विषयक काम करणारे विकास पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment