चाकण, राजगुरूनगर गजबजले!: - व्यापार्यांच्या बंदमुळे पुणे, पिंपरीच्या ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी
राजगुरूनगर। दि. १३ (वार्ताहर)
एलबीटीमुळे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील ग्राहक किराणा-भुसारसारख्या अत्यावश्यक मालाच्या खरेदीसाठी राजगुरुनगरपर्यंत येऊ लागले आहेत. एलबीटीविरोधात आंदोलनामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमधील दुकाने बंद असल्याने ग्राहक चाकण-राजगुरुनगरपर्यंत येऊ लागले आहेत. कापड, भांडी किंवा इतर नित्योपयोगी वस्तूंच्या खरेदीकरिता ग्राहक संप मिटण्याची वाट पाहत आहेत.; पण किराणा भुसार मालाची- ज्यामध्ये गहू-ज्वारीसारखी धान्ये, डाळी, तेल-मीठ, मसाले, साबण इत्यादी गोष्टी येतात- त्यासाठी लोक आता चाकणला आणि त्यापुढे राजगुरुनगरलाही येऊ लागले आहेत. राजगुरुनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने आणि अनेक उपविभागीय कार्यालये येथे असल्याने पुण्याहून गावात रोजच्या रोज येणार्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. बँका, एलआयसी विमा कंपन्या इत्यादी आस्थापनांमध्येही पुणे-चिंचवड परिसरातून येणार्या लोकांची संख्या मोठी आहे. ते जाताना राजगुरुनगरमधून किराणा माल घेऊन जात आहेत. याचबरोबर, ज्यांच्याकडे लग्नकार्य आहे, असेही लोक इकडे येत आहेत, असे संदेश भनसाळी या किराणा व्यापार्याने सांगितले.
No comments:
Post a Comment